मासरूळ : धामणगाव ते मढ फाटा या रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे़ या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ त्याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़
धामणगाव ते मढ फाटा रस्त्याची दुरावस्था झाली आहे़ या रस्त्यावर माेठ-माेठे खड्डे पडले आहेत़ या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही़ त्यामुळे, अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या रस्त्यावर धामणगाव, मासरूळ, गुम्मी, तराडखेड, शिकापूर, मराठवाड्यातील पारद पद्मावती आदी गावे आहेत़ या गावातील नागरिकांना विविध कामांसाठी बुलडाणा शहरात यावे लागते़ खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे़ परिसरातील रुग्णांना बुलडाणा येथे उपचारासाठी आणण्यासाठी नातेवाईकांना माेठी कसरत करावी लागत आहे़ या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेषराव सावळे, संभाजी देशमुख, किरण उगले, बाळू सपकाळ, मधुकर महाले, प्रकाश नरवाडे, आत्माराम साळवे, देवीदास पवार, सुभाष पवार, संदीप सपकाळ, दादाराव सावळे, सुनील सावळे, दादाराव महाले, विश्वनाथ महाले, किरण देशमुख, दिलीप माळोदे, संदीप काटोले, डॉ़ फुसे आदींनी केली आहे़
ग्रामस्थांचा आंदाेलनाचा इशारा
धामणगाव ते मढ फाटा या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची वारंवार मागणी ग्रामस्थांकडून हाेत आहे़ मात्र, संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत़ येत्या काही दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य दिलीप नामदेव शिनकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे़