विश्वमाऊली सेवाश्रमाला मिळाली मदत
बुलडाणा : म्हसला बु. येथे विश्वमाऊली जनसेवा बहुउद्देशीय संस्थेमार्फत ‘विश्वमाऊली सेवाश्रम’ या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पासाठी पद्मश्री डॉ. सिंधूताई सपकाळ अनाथांची माय यांनी या संस्थेच्या बांधकामासाठी रुपये २१ हजार रुपयांची मदत केली आहे.
लसीकरणाविषयी शिक्षकांनी केले मार्गदर्शन
माेताळा : कोरोना या आजारासोबतच लसीबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांच्यावतीने ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुटुंब सर्वेक्षण करण्यासाठी अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सीमा गोरे, सुनीता न्हावकर व संध्या नाईक या शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.
खंडित वीज पुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त
डाेणगाव : परिसरात गत काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत . थाेडा जरी पाऊस आला, तरी वीज पुरवठा खंडित करण्यात येताे़. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे़
गरजुंना केले मास्कचे वाटप
किनगाव राजा : प्राथमिक आरोग्य केंद्रात १० जूनराेजी मास्कचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख यांच्या सूचनेवरून नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सायली जाधव, विजयसिंह राजे जाधव व इतर उपस्थित हाेते.
कपडा व्यावसायिक आर्थिक संकटात
बुलडाणा : जिल्ह्यात अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे़. कपडा व्यावसायिकांकडे जुना माल पडून असून, त्याची विक्री हाेईल किंवा नाही, असा प्रश्न या व्यावसायिकांसमाेर पडला आहे.
पाेखरा याेजनेत वंचित गावांचा समावेश करा
देऊळगाव राजा : पोखरा योजनेत तालुक्यातील वंचित गावांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या पोखरा योजनेत देऊळगावराजा तालुक्यातील ४८ गावांपैकी फक्त बायगाव, डोड्रा, मंडपगाव व पिंपरी आंधळे या चारच गावांचा समावेश करण्यात आला आहे.
साेयाबीन बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी
बुलडाणा : सोयाबीन बियाणे उगवण क्षमता कमी असल्यामुळे बियाणे जास्त प्रमाणात अपात्र झाले. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना बियाण्यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे, बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.
आशा वर्करचा १५ जूनपासून संप
बुलडाणा : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, याकरिता आशा वर्कर १५ जूनपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. शासनकर्त्यांनी आशा वर्कर महिलांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा इशारा आशा वर्कर संघटनेने दिला आहे.
काेलवड येथील युवक, युवती बेपत्ता
बुलडाणा : येथून जवळच असलेल्या कोलवड येथून अठरा वर्षीय तरुणी व पंचवीस वर्षीय विवाहित तरुण गायब झाले आहेत. प्रकरणी मुलगी हरवल्याची तक्रार वडिलांनी, तर पती हरवल्याची तक्रार पत्नीने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला केली आहे.
शेतरस्त्यावर साचला चिखल
जानेफळ : मागील काही वर्षांत जानेफळ-सोनारगाव या पाणंद रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी अनेकवेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. डांबरीकरण होणार म्हणून या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे दानपत्रदेखील दिले आहे. या रस्त्यावर पहिल्याच पावसात चिखल साचला आहे.
बसफेरी सुरू करण्याची मागणी
बुलडाणा : लॉकडाऊन शिथिल होऊनही पातुर्डा प्रवाशांना बस सेवेची प्रतीक्षाच आहे. शेगाव व जळगाव जामोद आगा प्रमुखांनी पातुर्डा बस फेरी सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. गावाची लोकसंख्या व गावाला २०-२५ खेडे लागून आहेत़
शेती मशागतीची कामे अंतिम टप्यात
धामणगाव बढे : परिसरात मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने शेतीचे कामे आटोक्यात आली होती. दरम्यान, मान्सूनच्या पावसानेदेखील दमदार हजेरी लावत पेरणीयोग्य पाऊस झाला. पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.