लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथील खरेदी-विक्री संघाने २६ एप्रिलपर्यंत फक्त २५ टक्के शेतकºयांची तूर खरेदी केली असून, ७५ टक्के शेतकºयांची तूर घरातच पडून आहे. कासवगतीने तुरीची खरेदी होत असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीचा पेरा करीत असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकºयाला ४ ते ५ क्विंटल तुरीचे उत्पादन शेतकºयांना होते. तुरीचे पीक हक्काचे समजून आणि भाव चांगला मिळतो, या भोळ्यापणामुळे शेतकरी तूर पेरतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बाजारपेठेत तुरीचे भाव पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. तुरीला खरेदीदार मिळत नसल्याने शासनाने तुरीचे हमीभाव ठरवून तूर खरेदी केंद्र प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरू केले. ही जबाबदारी खरेदी-विक्री संघाकडे देऊन प्रत्येक शेतकºयाला तूर विक्रीसाठी आॅनलाइन नाव नोंदणीसाठी बँक खाते नंबर, आधार कार्ड, सात-बारा, पेरेपत्रक इ. कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले. तालुक्यातील ४ हजार शेतकºयांनी दोन महिन्यांपूर्वी अर्ज नाव नोंदणीकरिता दिले. त्यापैकी केवळ ८३१ शेतकºयांची नावाची नोंद होऊन १० हजार ७३७ क्विंटल ९७ किलो तुरीची खरेदी २६ एप्रिलपर्यंत तुरीची खरेदी झाली आहे. ४ हजार शेतकºयांनी नाव नोंदणीसाठी अर्ज करूनही केवळ ८३१ शेतकºयांची तूर मोजणी झाली. आज प्रत्यक्षात ३१६९ शेतकºयांची खरेदी बाकी आहे. एकूण ४० हजार क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट असून, शेतकºयांच्या घरात २९ हजार २६३ क्विंटल तूर बाकी आहे. शासनाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिली; परंतु सिंदखेडराजा खरेदी-विक्री केंद्रावर कासव गतीने खरेदी सुरू असल्याने नाव नोंदणीसाठी अर्ज करूनही ७५ टक्के शेतकºयांना कोणताही मॅसेज प्राप्त झाला नाही. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ सुरू असून, अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय तूर खरेदी होत नाही, असा आरोप अनेक शेतकºयांनी केला. तुरीचे माप व्हावे म्हणून अनेक वेळा शेतकºयांनी आंदोलने केली. आरोप-प्रत्यारोप झाले; परंतु प्रशासकीय यंत्रणा किती धिम्या गतीने काम करते, याचा प्रत्यय शेतकºयांना आला आहे. शेतकरी हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, धर्माचा, पंथाचा नसून, तो या देशाचा अन्नदाता आहे, याचे भान ठेवून राजकीय नेत्यांनी तुरीची खरेदी वेगाने कशी होईल, याचे भान ठेवून ७५ टक्के शेतकºयांना न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा त्यांची आहे.
सिंदखेडराजा : खरेदीअभावी शेतक-यांची तूर घरातच पडून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:46 AM
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथील खरेदी-विक्री संघाने २६ एप्रिलपर्यंत फक्त २५ टक्के शेतकºयांची तूर खरेदी केली असून, ७५ टक्के शेतकºयांची तूर घरातच पडून आहे. कासवगतीने तुरीची खरेदी होत असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठळक मुद्दे२६ एप्रिलपर्यंत फक्त १० हजार ७०० क्विंटल खरेदी