लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीतील महिला कर्मचार्यांबद्दल अश्लील लिखाण करून बदनामी करणार्या, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील दैनिक साहसिकच्या संपादकास बुलडाणा शहर पोलिसांनी रविवारी अटक केली. सदर आरोपीस ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.येथील बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या शखा व्यवस्था पक प्रीती अनिरुद्ध कोलारकर यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील दैनिक साहसिकचे संपादक आरोपी रवींद्र नरहरीपंथ कोटंबकर याने बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीतील महिला कर्मचार्यांविरुद्ध अश्लील लिखाण करून बेबसाइट व सोशल मीडियावर प्रसिद्ध करून बुलडाणा अर्बन क्रेडिट सोयायटी व या संस्थेतील काम करणार्या महिलांची बदनामी केली. या तक्रारीवरून भादंवि ५00, ५0१, ५0२ सह ६४, ६६, अ., ई, तसेच ६७ अ, ७४ आयटी अँक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपी रवींद्र नरहरीपंथ कोटंबकर यास १0 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील जाधव करीत आहेत.
महिला कर्मचार्यांबद्दल अश्लील लिखाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:12 AM
बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीतील महिला कर्मचार्यांबद्दल अश्लील लिखाण करून बदनामी करणार्या, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील दैनिक साहसिकच्या संपादकास बुलडाणा शहर पोलिसांनी रविवारी अटक केली. सदर आरोपीस ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ठळक मुद्देसेलू येथील संपादकास अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी