लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मराठा पाटील युवक समितीच्या व्हॉटसअप ग्रुपवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे युवकांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २० जूनरोजी रात्री ७.३० वाजता येथील गांधी चौकात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.गुरुवारी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास युवकांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकाराने गांधी चौकात खळबळ निर्माण झाली होती. शिवाय घटनेनंतर पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही गटातील युवकांनी गर्दी केल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला होता. या घटनेशी संबधीत युवक हे प्रतिष्ठीत असल्याने राजकीय व्यक्तींनी सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये प्रकरण मिटवण्यासाठी धाव घेतली होती. अखेर याप्रकरणी गुरुवारी रात्री २ वाजता गजानन ज्ञानदेवराव ढगे यांच्या तक्रारीवरून कपील शेळके व केतन भादुका यांच्याविरुद्ध कलम ३२४, ५०४, ३४ भादविंअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन ढगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मराठा पाटील युवक समितीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ‘तुम्ही मागून वार करणारे आहात’ अशा आशयाची पोस्ट टाकल्याच्या कारणावरून कपील शेळके व केतन भादुकाने गांधी चौकातील मेडीकलवर येवून सचिन ठाकरे व गजानन चांभारे यांना रॉप्टरने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर कपील चारुदत्त शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० जूनरोजी संध्याकाळी ७.३० वाजता ते त्यांचा मित्र केतन भादुका याच्यासोबत जात होते. दरम्यान गजानन ढगे यांना कपील शेळके यांचा धक्का लागला. यावरून गजानन ढगे यांनी धक्का का मारला असे म्हणत त्यांच्यासह श्रीधर ढगे, सचिन ठाकरे यांनी कपील शेळके व केतन भादुका यांना लाकडी रॉप्टरने मारहाण केली. यामध्ये केतन भादुका याच्या नाकावर मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कपील शेळकेच्या तक्रारीवरून गजानन ढगेसह तिघांविरुद्ध कलम ३२४, ५०४, ३४ भादवी नुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
सोशल मिडीयावर पोस्टमुळे युवकांच्या दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 3:09 PM