नांदुरा : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने समित्या बरखास्त करून प्रभार प्रशासकाकडे देण्याची प्रक्रीया पूर्ण केली. त्यावर संबंधितांना पणन संचालकांकडे याचिका दाखल केल्या. नांदुरा बाजार समिती सभापतींनी दाखल केलेल्या याचिकेनुसार प्रशासक पदाला पुढील म्हणजे ७ सप्टेंबर रोजीच्या सुनावणीपर्यंत स्थगिती दिल्याचा आदेश पणन संचालकांनी सोमवारी दिला आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी २०२० मध्ये बाजार समित्यांच्या निवडणुकीस सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ जुलै महिन्यातच संपत असताना दहा जुलै दरम्यान त्यास पुन्हा सहा महिने मुदत वाढ दिल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांची मुदत संपल्याने या बाजार समित्यांवर ३० जून रोजी जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासकांची नियुक्ती केली होती.दरम्यान यासंदर्भात चार बाजार समितीमधील सभापती व संचालक मंडळांनी पुणे येथील पणन संचालकांकडे याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर आठ जुलै दरम्यान पुणे येथील पणन संचालकांनी ह्यजैसे थेह्णचे आदेश दिले होते.२८ जुलै रोजी नांदुरा बाजार समितीची मुदत संपली. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीवर प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधकांची नियुक्ती केली. त्या नियुक्तीला सभापती बलदेव चोपडे यांनी पणन संचालकांकडे आव्हान दिले. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत प्रशासक पदाला ७ सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली. त्या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे. पणन संचालकांकडे होणाऱ्या या सुनावणीकडे नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांसह तालुक्यात्ील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.सहकार मंत्र्याकडेही सुनावणी सुरूजिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांची प्रकरणे सहकार मंत्र्यांकडेही दाखल केलेली आहेत. त्याची सुनावणी मंगळवारी नियोजित होती.मात्र, सहकार मंत्र्यांनाच कोरोना संसर्ग झाल्याने ती सुनावणी आताअशक्य झाली आहे. त्यामध्ये खामगाव बाजार समितीसह इतरसमित्यांच्या प्रकरणांचा समावेश आहे. पुढील अनिश्चित काळासाठी ही समिती स्थगित होण्याची शक्यता आहे.
नांदुरा बाजार समिती प्रशासक नियुक्तीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 1:12 PM