पेरण्या खाेळंबल्याने शेतकरी त्रस्त
सिंदखेडराजा : तालुक्यातील विचित्र पर्जन्यमानामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला निसर्गाचा लहरीपणा समोर आला आहे. त्यामुळे यावर्षी तालुक्यातील काही भागांत दुबार पेरणी तर काही भागांत पेरणी खोळंबली असल्याचे वास्तव चित्र आहे.
देऊळगाव मही येथे गुटखा जप्त
देऊळगाव मही : येथील मुख्य मार्गावर असलेल्या एका पानटपरीत साठवून ठेवलेला ४ हजार ९२० रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. सदर कारवाई काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली़
श्यामा प्रसाद मुखर्जींना अभिवादन
बुलडाणा : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये २३ जूनला प्रेरणा स्त्रोत स्व.डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी या कार्याविषयी माहिती दिली़
विद्यार्थ्यांनी याेगाचा प्रसार करावा
देऊळगाव राजा : आपल्या भारतीय प्राचीन योगविद्येचा स्वीकार आता संपूर्ण विश्वाने केला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गावात योगा व प्राणायामचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन राजे विजयसिंह जाधव यांनी केले.
मानवी कल्याणाचा अमूल्य ठेवा जपा
चिखली : भारतीय ऋषीमुनींनी जगाला निरोगी ठेवणारी अमूल्य अशी योगसंस्कृती दिलेली आहे. भारतीय संस्कृतीचा हा मानव कल्याणाचा अमूल्य ठेवा जपा, असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केले़
किनगाव राजा परिसरात पावसाची प्रतीक्षा
किनगाव राजा : किनगावराजा व परिसरातील काही ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली़; परंतु त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
महिला मंडळाच्या वतीने याेगदिन साजरा
बुलडाणा : जागतिक याेगदिनाचे औचित्य साधून हिरकणी महिला मंडळ जुनागाव बुलडाणा व श्री माउली ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने महिलांसाठी याेगाचे आायेजन करण्यात आले हाेते. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा अल्का खांडवे यांच्यासह इतर महिला उपस्थित हाेत्या.
धापटी येथे काेराेना लसीकरण
मेहकर : तालुक्यातील धापटी येथील जिल्हा परिषद शाळेत काेराेना लसीकरण पार पडले. गावातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आराेग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी केले. सिंदखेडराजा
वन्यप्राण्यांचा हैदाेस; शेतकरी त्रस्त
सिंदखेड राजा : मोठ्या कष्टाने लागवड व संवर्धन केलेल्या संकरित भेंडी प्लॉटचे रोही प्राण्यांनी नुकसान केले असल्याची घटना तालुक्यातील निमगाव वायाळ येथे २३ जूनला सकाळी उघडकीस आली आहे. वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे़
अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी
धाड : मौढाळा येथे होत असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याकडे २३ जूनला एका निवेदनाद्वारे केली आहे.