लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव - स्थानिक पाणी पुरवठा योजनेकडे २० लाखांपेक्षा अधिक थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून डोणगाव येथील पाणी पुरवठ्याची वीज जोडणी कापण्यात आली. त्यामुळे डोणगाव येथे पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात ऐरणीवर आला आहे.
डोणगाव येथील ग्रामपंचायतीचा महावितरणकडे २५ वर्षांपासूनचा १३ लाख ९८ हजारांचा कर थकीत आहे.
तर डोणगाव ग्रामपंचायतीकडे विद्युत वितरण कंपनीचे १७ लक्ष ३६७६० थकीत आहे. दरम्यान, उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आणि पाण्याची मागणी वाढली. अशातच मागील एक वर्षापासून कसातरी सुरळीत झालेला पाणी पुरवठा आता विद्युत पुरवठा खंडित केल्याने पुन्हा विस्कळीत झाला.
चौकट
पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट
डोणगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. त्यात पुन्हा वाढीव निधीसुद्धा मिळाला; मात्र ८ वर्षे होत असताना गाव परिसरात अद्याप पाणी आलेले नाही. पूर्वीची जुनी नळ योजना कशीतरी सुरू झाली होती. त्यावर १२०० नळ कनेक्शन आहेत. मात्र येथील नळ योजनेवरील विद्युत कनेक्शनचे थकीत २० लाख ३७ हजार १९६ रुपये थकीत असल्याने अखेर येथील पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन १० दिवस अगोदर विद्युत वितरण विभागाने खंडित करून टाकले. डोणगाव ग्रामपंचायतीचे मागील २५ वर्षांपासून विद्युत वितरण कंपनीने कर भरणा केलेला नाही. हा कर सध्या १३ लाख ९८ हजार रुपये झालेला आहे. दोन विभागांच्या थकितीत गाववासीयांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.