बुलडाणा : महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप डांगे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. खासबागे यांच्या अध्यक्षस्थानी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीमध्ये मागील वर्षी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण केले.
शासकीय कार्यालयातील दूरध्वनी सुरू करा
बुलडाणा : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शासकीय कार्यालयातील दूरध्वनी सुरू करावे, सात दिवसाच्या आता दूरध्वनी सुरू न झाल्यास १५ एप्रिल रोजी आंदोलन करेल, असा इशारा लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील संजाब पनाड यांनी दिला आहे.
लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
बुलडाणा : कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे वर्षभरापासून सगळे त्रस्त आहेत. यावर लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपचार असून कोविड लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य सभापती तथा उपाध्यक्षा कमल बुधवत यांनी केले आहे.
मतदार यादीतील छायाचित्र तपासून घ्यावे
लोणार : तालुक्यातील नागरिकांनी मतदार यादीतील आपले छायाचित्र तपासून घ्यावे असे, आवाहन तहसीलदार सैफन नदाफ यांनी केले आहे. १ जानेवारी २०२१ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे.
कोरोनाचा कर वसुलीवर परिणाम
बुलडाणा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा पालिकेच्या कर वसुलीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाने निर्बंध लावल्याने अनेक दुकाने मोजक्याच वेळेत सुरू आहेत. यामुळे नुकसान होत असल्याने अनेकांनी कर भरलाच नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोना वाढूनही बससेवा सुरळीत
चिखली : सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तरीदेखील एसटीची प्रवासी वाहतूक सुरळीत आहे. या वाहतुकीवर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. कोरोनाबाबत नागरिकांच्या मनातील भीती कमी झाली आहे.
पिकविम्याचा लाभ देण्याची मागणी
बुलडाणा : जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत असूनही शेतकºयांना पिकविम्याचा लाभ मिळालेला नाही. तक्रार केलेल्या शेतकºयांनाचा लाभ मिळाला आहे. यामुळे पिकविम्याचा सरसकट लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांनी मंगळवारी कृषी विभागाकडे केली.
हरभरा काढणी अंतीम टप्प्यात
धाड : परिसरातील शेतकºयांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. सध्या हरभरा काढणी अंतीम टप्प्यात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादन समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.
नियम मोडणाºयांवर कारवाईचा अभाव
देऊळगावमही : येथील नागरिक मास्क न बांधता फिरताना दिसून येत आहेत. बाजारपेठेत इतरही कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे. तरीदेखील ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येते.
कांदा काढणीच्या मजुरीत वाढ
मोताळा : तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकांची लागवड केली आहे. सुरुवातील लागवड केलेल्या शेतकºयांचा कांदा काढणीला आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काढणीचे दर वाढले आहे.