धाड : राज्यभरात शेतकरी संपाचे आंदोलन तीव्र होत असतानाच आज धाडमध्ये "प्रहार" जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते यांच्या नेतृत्वात २ जून रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमर दूध डेअरी (बोदवड, जि. जळगाव) चे दुधाचा टँकर रिता करण्यात आला, तसेच शासन विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, यांसह अन्य मागण्यांसाठी किसान क्रांती राज्य समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी मध्यरात्रीपासून राज्यभर संप पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरत असतानाच २ जून रोजी धाड येथे प्रहार जनशक्ती पक्षही आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रहारचे जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तसेच विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासन विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अमर दूध डेअरी (बोदवड जि. जळगाव) यांचे दूध घेऊन जाणारे १० हजार लिटर दुधाचा टँकर रिता करण्यात येऊन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते गणेश बाजी, विनायक वाघ, निंजा बॉईजचे नीलेश गुजर, प्रदीप टाकसाळ, विजय जाधव, नंदु जाधव, गुलाबराव गुजर, संतोष उबाळे, रतन नादरकर, उमेश घाडगे, शरद आपार, नाना गुजर, विष्णू दौड, स्वप्निल साखळे, गोपाल वाघुर्डे, शुभम पांदे, सुभाष मोहिते, भागवत बोराडे, गणेश जाधव, अजय संतापे, रामेश्वर वासे, दीपक काकडे, योगेश पालकर, अक्षय पवार, शुभम लहाने, मयूर अपार, नितीन ठाकरे, सौरव शिंदे, आकाश बोराडे, हेमंत उबाळे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
‘प्रहार’ने १० हजार लिटर दूध रस्त्यावर ओतले!
By admin | Published: June 03, 2017 12:45 AM