लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेत जमिनी खरडून गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन खा. प्रतापराव जाधव यांनी ३० जून रोजी दिले.अतिवृष्टीने बुलडाणा तालुक्यातील कोलवड, तांदुळवाडी, हतेडी, अंभोरा शिवारात प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, भोजराज पाटील, तालुकाप्रमुख डॉ. मधुसुदन सावळे, बबनराव भोसले, किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, बाजार समिती संचालक राजू पवार, युवा सेना समन्वयक राजू मुळे, संजय तायडे, शंकर तायडे, बबन जाधव, रामेश्वर भोपळे, बबन पाटील, अरुण जाधव, संजय जाधव, अंबादास पाटील, सुभाष चव्हाण, दीपक रिंंढे, साहेबराव तायडे, श्रीकृष्ण तायडे, ज्ञानेश्वर पवार, धनंजय भोपळे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संतोष शिंदे, तालुका कृषी अधिकारी चोपडे, नायब तहसीलदार अमरसिंग पवार, मंडळ भिकारी राऊत, तलाठी सावळे, राजपूत उपस्थित होते. पावसाने विहीर व शेतीचे झालेले नुकसान याबद्दल अधिकाºयांनी अडवणुकीचे धोरण न ठेवता सहकार्याच्या भूमिकेतून शेतकºयांच्या संकटात त्यांना साथ देण्याचे आवाहन जाधव यांनी केले. तांदुळवाडी मध्ये जवळपास ६० हुन अधिक घरामध्ये पाणी घुसून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी झालेल्या नुकसानाचा तात्काळ सर्वे करावा, अशा सूचनाही जाधव यांनी दिल्या.(प्रतिनिधी)
नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार- प्रतापराव जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 2:56 PM