- जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: यावर्षी देश मोठ्या नैसर्गिक आपत्तीत सापडणार असून भरपूर पाऊस होणार आहे. पीक परिस्थिती साधारण राहील .तर अतिवृष्टी भरपूर होईल .देशाचा राजा कायम राहील मात्र त्याच्यावर प्रचंड ताण असेल. संरक्षण व्यवस्था मजबूत असली तरी शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन देशावर येणार्या संकटासी लढा करावा लागेल,असे भाकीत भेंडवड घटमांडणी केले आहे.
सुप्रसिद्ध भेंडवड घटमांडणी केवळ चार लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली. या घटमांडणीचे भाकीत अखेर आज दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी केले.
घटामध्ये ठेवलेल्या करव्यावरील पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी पूर्णतः गायब होती. त्यामुळे संपूर्ण विश्वात नैसर्गिक संकटे येतील कुठे कृत्रिम आपत्ती येईल. परकीय शत्रूपासून घुसखोरी आतंकवादी कारवाया सुरू राहतील. साथीचे आजार पसरून जग त्रस्त होईल. अनेक ठिकाणी महापूर येतील. प्रचंड अतिवृष्टी होईल .भूकंप त्सुनामी सारखी संकटे देशावर सांगितली आहेत.
पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे त्यामुळे पीक परिस्थिती साधारण सांगितलेली आहे. यावर्षी कुलदेवतेचा प्रकोप देशावर आहे. तर जनमानसावर तसेच पिकांवर सुद्धा रोगराई चे कमीअधिक प्रमाण राहील. चारा पाण्याची टंचाई भासणार आहे. संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. परंतु त्यांच्यावर खूप ताण येईल .या सर्व गोष्टींचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, त्यामुळे देशाची आर्थिक तिजोरी खाली होऊन देश आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. आजच्या भाकितमधून वर्तविली गेली आहे.
जनजीवन संकटात येईलएकंदर पाणी पावसाने पिके वगळता इतर संकटांची या वर्षात मोठी सरबत्ती राहील त्यामुळे जनजीवन संकटात येईल. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे राहून संकटावर मात करण्याची गरज निर्माण होणार आहे, असे धक्कादायक अंदाज या वर्षीच्या भेंडवड घटमांडणीतून वर्तवण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)