ठिबक नळ्या पसरविणे, जमीन नांगरणी करणे, चांगल्या बियाण्यांची माहिती करून घेणे, आदी कामे होताना दिसत आहे. जमीन नांगरणीसाठी शेतकरी ट्रॅक्टरला पसंती देत असून, त्यामुळे शेतातील कामे लवकर होण्यास मदत होते. तरीही मजुरांची टंचाई शेतकऱ्यांना भेडसावत असल्याने शेतातील कामांना अडथळा निर्माण होत आहे. म्हणून आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेतीच्या मशागतीवर भर देण्यात येत आहे. सध्याचे दोन दिवस पावसाचे सोडले, तर इतर दिवस उन्हाची तीव्रता प्रचंड होती. त्यामुळेही शेती कामावर परिणाम झाला आहे.
बी-बियाण्यांवर चर्चा
दिवसभर शेतातील कामे करून, रात्री एकत्र आल्यानंतर शेतकरी वर्ग बी-बियाण्यांवर चर्चा करताना दिसतात. यावर्षी कोणते बियाणे चांगले असेल, याचा अंदाज घेतला जात आहे. मागील वर्षाचा अनुभव आणि या वर्षाचा उत्पन्नाचा अंदाज या जोरावर शेतकरी बियाण्याची निवड करीत आहेत. एकंदरीत मे महिना जसजसा संपण्यात येत आहे, तसतशी शेतकऱ्यांची शेती मशागतीसाठी लगबग वाढत आहे.