लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील बुलडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या यावर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी म्यानमार (ब्रम्हदेश) येथील मंदिराची प्रतिकृती गणेशभक्तांचे आकर्षण राहणार आहे. याशिवाय बुलडाणा अर्बन गणेश मंडळातर्फे पश्चिम विदर्भ, जळगाव खान्देश आणि औरंगाबाद जिल्हय़ातील गायिका-गायकांसाठी आयोजित केलेली बुलडाणा आयडॉल स्पर्धा समस्त कला रसिकांसाठी आकर्षण ठरणार आहे. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदा १६ वर्षे असून, दरवर्षी मंडळाच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांना आजपर्यंत कलारसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावर्षीदेखील १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २0१७ या कालावधीत गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळाची तयारी पूर्ण झाली आहे.गणेशोत्सव मंडळाच्यावतीने २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. बुलडाणा अर्बन मुख्यालय आवारात उभारण्यात आलेल्या मंडपात o्री गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. २६ ऑगस्ट रोजी संस्थेच्या कर्मचार्यांच्या विविध स्पर्धा होणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता अथर्वशीर्ष पठण, उपासना होणार आहे, तर २ सप्टेंबर रोजी राजुरघाट येथे संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वृक्षारोपण करणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी बुलडाणा आयडॉल स्पर्धेची उपांत्य फेरी आणि ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात बुलडाणा आयडॉल स्पर्धेची महा अंतिम फेरी आयोजित करण्यात आली आहे. ६ सप्टेंबर रोजी आनंद मेळावा होणार आहे. याबाबतचे विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाइी बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असून, विविध समितीच्या माध्यमातून आपले कार्य पार पाडत आहेत. बुलडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित आयडॉल स्पर्धेचा गणेशभक्त व कलारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो.
बुलडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:29 PM
बुलडाणा : येथील बुलडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या यावर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
ठळक मुद्देआयडॉल स्पर्धा ठरणार आकर्षणम्यानमार येथील मंदिराची प्रतिकृती राहणार गणेशभक्तांचे आकर्षण