जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम सुलज येथील महिला शेतकरी विमलताई विजयराव टापरे यांनी रब्बी हरभरा पिकाचे हेक्टरी ४६ क्विंटल उत्पादन घेतल्याने त्यांना जिल्हास्तरावरील प्रथम पारितोषिक घोषित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण एक जुलै रोजी कृषी दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नामदार डॉ.राजेंद्र शिंगणे,खासदार प्रतापराव जाधव,जि.प.अध्यक्षा मनिषा पवार, जिल्हाधिकारी एस राममूर्ती व मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले. रब्बी हंगाम पीक स्पर्धा सन २०२०-२१ मध्ये सर्वसाधारण गटातून हरभरा या पिकाचे विमलताई टापरे यांनी हेक्टरी ४६ क्विंटल उत्पादन घेतल्यामुळे त्या जिल्हास्तराच्या प्रथम पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सन्मानपत्र,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा कृषी दिनी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला. यावेळी जि.प.उपाध्यक्ष कमलताई बुधवत,कृषी सभापती राजेंद्र पळसकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.विमलताई समवेत ज्येष्ठ पुत्र तुषार टापरे व मंडळ कृषी अधिकारी संदीप निमकर्डे याप्रसंगी सहभाग होता.