साखरखेर्डा : ग्रामपंचायत सदस्य शे युनूस शे. आसीन याच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर पाेलिसांनी ५ सप्टेंबर राेजी छापा टाकून आठजणांवर कारवाई केली.
ग्रामपंचायत सदस्य शे. युनूस शे. यासीन याच्या घरात जुगार सुरू असल्याची माहिती ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना मिळाली. त्यांनी रात्री गस्त घालीत असताना जुगारावर छापा टाकला. या छाप्यात साखरखेर्डा येथील सैयद जुनेद सैयद समदान, शे़ आरिफ शे़ कादर, स्वप्निल राजेंद्र गायकवाड, विकास उद्धव यरमुले यासह आठजण जुगार खेळताना पकडले. त्यांच्या जवळून एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष उल्लेखनीय म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात खुलेआम जुगार सुरू आहे. याच जुगारात साखरखेर्ड्यात अनेकदा हाणामारीच्या घटना देखील घडल्या आहेत. जुगार खेळणारी एक टोळी सक्रिय आहे.
ते सरपंच, माजी उपसरपंच कोण?
येथील जुगारात साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेडेगावातील सरपंच तथा साखरखेर्डा येथील एका माजी उपसरपंचाचा समावेश असून, ते दोघे जुगारात सहभागी होते याबाबतचे सत्य समोर येणे गरजेचे आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.