शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

नागरिकत्त्व कायद्याविरोधात जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 2:59 PM

शांतता आणि न्याय मोहिम (कॅम्पेन आॅफ पीस अ‍ॅण्ड जस्टिस इन इंडिया) या संघटनेच्यावतीने १७ जानेवारी रोजी स्थानिक जयस्तंभ चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : केंद्रातील भाजप सरकारने पारित केलेल्या नागरिकत्त्व संशोधन कायदा व अनुषंगिक सीएए, एनपीआर या कायद्याच्या विरोधात जिल्हाभरात मोर्चे, धरणे आंदोलने करण्यात आले. या विरोधात शांतता आणि न्याय मोहिम (कॅम्पेन आॅफ पीस अ‍ॅण्ड जस्टिस इन इंडिया) या संघटनेच्यावतीने १७ जानेवारी रोजी स्थानिक जयस्तंभ चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.संपूर्ण देशभरात वादंगाचा विषय ठरलेल्या या कायद्याच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात व्यापक प्रमाणात आंदोलने करण्यात आले. विविध राजकीय पक्ष सामाजिक, धार्मिक संघटनांनी जवळपास सर्व तालुकास्थळी व मोठ्या गावांमध्ये सुद्धा मोर्चे काढण्यात आले. डिसेंबरअखेर राज्यातील महाविकास आघाडीने जिल्हाभर आंदोलन केले. यानंतर बहुजन क्रांती मोर्चाने काढलेला मोर्चा देखील लक्षवेधी ठरला आहे. या पाठोपाठ ‘सीपीजे’ संघटनेने आक्रमक पवित्रा घेत थेट जेलभरो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन स्थानिक जयस्तंभचौक येथे करण्यात आले.यावेळी एनआरसी, सीएए, एनपीआर कायद्याविरोधात घोषणांनी जयंस्तभ चौक परिसर दणाणून सोडला होता. मोहम्मद सिफात शेख अस्लम, जाकीर कुरेशी, उमेद देशमुख, शब्बीर कुरेशी, डॉ. मुबीज खान, जावेद अली खान, मोहम्मद सोहिल, शेख अफतर, मोहसिन कुरेशी, शेहबाज हुसेन, सैय्यद अनिल यांच्या नेतृत्वात हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पोलिस व्हॅनमधून स्थानिक पोलिस स्टेशनमाध्ये आनल्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.यावेळी या आंदोलनात अनेक मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक