सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथे महावितरण कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाला मागील वर्षापासून कनिष्ठ अभियंता नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालत असून अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे लोकच या कार्यालयाचा कारभार चालवितात. या कार्यालयाचा कारभार दुसऱ्या कनिष्ठ अभियंत्याकडे दिलेला आहे. परंतु संबंधित कनिष्ठ अभियंता याठिकाणी येतच नाही. अनेक लोकांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, माझ्याकडून ते काम होत नाही, असे सांगण्यात येते. या गावांमध्ये रात्रीच्या गावठाण फिडरवरील विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कृषीच्या विजेचा नियमित पुरवठा होत नाही. महावितरणच्या या समस्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्यापर्यंत पोहचविल्या आहेत. त्यानंतर याची दखल येत तातडीने समस्या मार्गी लावण्याची सूचना सिंदखेड राजा येथील कार्यालयाला दिलेल्या होत्या. परंतु त्यावर काहीच उपाययोजना झाली नाही.
महावितरणकडे कनिष्ठ अभियंता नसल्याने अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:23 AM