येथील संत जगनाडे महाराज यांच्या मंदिरापासून टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सजविण्यात आलेल्या रथामध्ये संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणूक गावातून प्रदक्षिणा मारुती मंदिराजवळ पोहोचल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाखरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक जम्मन व्यवहारे, तैलिक महासभा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुषमाताई राऊत, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे, उपाध्यक्ष सुधाकर रायमूल, संतोष डोमळे, नानासाहेब पाखरे, डॉ. क्षीरसागर, सुभाष वाळके, भानुदास सराफ, संतोष तोंडे, प्रा. प्रदीप डोमळे इत्यादी उपस्थित होते. यानंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप डोमळे, राजू केदारे, गजानन वाडेकर, अमोल पाचपवार, अनिल पाखरे, गजानन वाळके, मोहन पाखरे, प्रभाकर लोखंडे, गोपाल व्यवहारे, मधुकर लोखंडे, सतीश नाके, गोपाल यवतकर, वैभव पाखरे, हरीश डोमळे, गोपाल खरात यांच्यासह या समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:31 AM