शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
7
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
8
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
9
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
10
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
11
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
12
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
13
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
14
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
15
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
16
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
17
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने विद्यूत बिलांची होळी करून निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 4:16 PM

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर विद्युत बिलांची होळी करण्यात येवून या वाढीव बिलाचा निषेध नोंदविण्यात आला. 

मलकापूर : वेळेवर बिल न येणे, बिल वाढीव येणे असे प्रकार नेहमी घडतात. त्यातच चुकीची वाढीव बिले देवून ग्राहकांना वेठीस धरण्यात येत आहे. या विरोधात ४ जानेवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर विद्युत बिलांची होळी करण्यात येवून या वाढीव बिलाचा निषेध नोंदविण्यात आला. सप्टेंबर २०१८ मध्ये झालेले संपूर्ण विज दर वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा निवेदनाद्वारे देण्यात आला. महावितरण वंष्ठपनीकडून ग्राहकांना देण्यात येणाठया विज बिलामध्ये अनेक प्रकारचे घोळ असून नाहक ग्राहकांना वाढीव व चुकीच्या बिलांचा भूर्दंड सोसावा लागत आहे. इंधन आकार, वीज आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार, इतर आकार, अतिरिक्त आकार अशा विविध प्रकारे विज बिलात रक्कमा वाढवून ग्राहकांना वाढीव बिले देण्यात येत आहे. वापरलेल्या विज बिला व्यतिरिक्त इतर विविध प्रकारे भूर्दंड लावून विज बिलाचा आकडा वाढवून ग्राहकांची एक प्रकारे लुटच विज वितरण कंपनीने चालविली आहे.  त्यातचसद्या हिवाळ्याचे दिवस असताना घरामध्ये पंखे, कुलर, एसी सारखी कोणतीही उपकरणे सुरू नसताना सुध्दा उन्हाळ्याप्रमाणेच विज बिले देण्यात येत आहेत. या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विद्युत बिलांची होळी करण्यात येवून, या वाढीव बिलाचा निषेध नोंदविण्यात आला. त्याचप्रमाणे सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आलेली विज दर वाढ तात्काळ रद्द न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुध्दा यावेळी एका निवेदनाद्वारे देण्यात आला. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचेसह शालीग्राम पाटील, बळीराम बावस्कर, देविदास बोंबटकार, शिवाजी भगत, कौतीक बोराडे, प्रमोद भिसे, दिपक अवसरमोल, ज्ञानदेव गावंडे, विनायक बोरले यासह आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.         (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरmahavitaranमहावितरण