लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: श्री श्री रविशंकरजी महाराज परिवाराकडून खामगाव परिसरातील १४८ गावांमध्ये शिबीरे घेवून नागरीकांना तणावमुक्ती, व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले. गेल्या २ ते ३० सप्टेंबर दरम्यान ही शिबीरे आयोजित करण्यात आली. खामगावपरिसरातील गावांमध्ये नागरींना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रकल्प भारत अंतर्गत ७०० प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी गावा-गावात जावून लोकांना योगा, प्राणायाम, ध्यान शिकवत तणावमुक्ती व व्यसनमुक्तीचे धडे दिले. या शिबीरांच्या माध्यमातून प्रकल्प भारत अभियान अंतर्गत ७०० प्रतिनिधी १४८ गावांमधिल ५००० लोकांपर्यंत पोहचले. या शिबीरांमध्ये शेतकºयांनाही मार्गदर्शन करण्यात आहे. रासायनिक खते, किटकनाशकांचा वापर टाळण्याचे आवाहन शेतकºयांना करण्यात आले. समाजस्वास्थ्यासाठी सेंद्रियशेतीची कास धरण्याचे आवाहनही प्रतिनिधींनी शेतकºयांना केले. यासाठी कार्यशाळाही घेण्यात आल्या. ‘आम्ही तुमच्यासाठीच आहोत’ असा भाव प्रतिनिधींनी गावकºयांसमोर व्यक्त केला. व्यसनमुक्तीसाठी केलेल्या जनजागृतीमुळे अनेकांना लाभ झाला आहे. (प्रतिनिधी)
फेबृवारीत रविशंकरजी खामगावात !्रप्रकल्प भारत अंतर्गत प्रतिनिधींनी राबविलेल्या शिबीरांमुळे लोकांमध्ये चांगला संदेश गेलाआहे. त्यामुळे असेच काम भविष्यातही मोठ्या प्रमाणावर होणे अपेक्षित आहे. परिणामी प्रतिनिधींना प्रोत्साहन देण्यासाठी श्री श्री रविशंकरजी महाराज फेबृवारी महिन्यात खामगावात येत आहेत. ८ फेबृवारी रोजी ते प्रतिनिधींसह नागरीकांना मार्गदर्शन करणार आहे. यानंतर भविष्यात प्रतिनिधींमार्फत सर्वच गावांमध्ये व्यसनमुक्तीचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी आणखी प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार आहेत.