मलकापुर:-विहिरीत पाणी उपलब्ध असुन डि.पि.च्या नादुरुस्ती मुळे शेतकऱ्यांची शेतात उभी असलेली पिके सुकत असल्याने डि.पी.दुरुस्तीच्या मागणीसाठी मलकापूरचे नगराध्यक्ष अँड हरीश रावळांनी शेतकऱ्यांसह म.रा.वि.वि.कंपनी कार्यालयात 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळ पासुन आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आमदार राजेश एकडे, जि.प.सदस्य वसंतराव भोजने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पिंपरे मँडमसह आदींनी भेट दिली. अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. नांदुरा तालुक्यातील रावळगांव,पिंप्रीकोळी,सावरगांव, ईसरखेड,खेडगांव येथील दोन रोहित्र दोन गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे विहिरीत पाणी असून लाईन अभावी शेतात उभी असलेली पिके सुकत असल्याने अँड हरीश रावळ यांच्या नेतृत्वात सतीश शिंदे, भागवत बावस्कार,सोपान हडपे, सुपडा बोरसे, नंदकिशोर शिंदे, राहुल गावंडे , मंगेश बोरसे, प्यारेलाल पांडे सरपंच सावरगांव नेहु, प्रमोद गांवडे , शांताराम बोरसे, अनिल रावणचवरे,महादेव जाधव, संतोष माने ,प्रल्हाद गुजर, शुभम बाढे, संजय पटेल,उल्हास शिंदे,रामचंद्र पवार सह आदी शेतकऱ्यांनी नांदुरा येथील म.रा.वि.वि कंपनी उपकार्यकारी अभियंता डि.आर.मिसाळ यांच्या कार्यालयातच आमरण उपोषणास सुरुवात केली होती. जोपर्यंत डि.पी वरील विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही उपोषण सोडणार नसल्याचे अँड रावळ यांनी सांगितले होते. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मलकापुर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे, जि.प.सदस्य वसंतराव भोजने, विजयसिंह राजपूत, पं.स.सदस्य संजय जाधव, भगवान धांडे, पद्मसिंह पाटील,अतिरिक्त कार्यकारी अभियंता पिंपरे मँडम, कार्यकारी अभियंता मिसाळ,अभियंता खान,आदींनी भेट देत ग्राम टाकळी येथून 19 नविन पोल टाकून खेडगांव पर्यंत लाईन लाईन आणून कायमस्वरूपी शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मिटवण्याचे तसेच विद्युत पुरवठा सुरळीत ठेवून मेंटेनन्स चे ठेकेदाराला सर्व काम दहा दिवसाच्या आत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळाले. महावितरण कंपनीतर्फे लेखी आश्वासन मिळाल्याने अॅड. हरीश रावळ व शेतकऱ्यांच्या उपोषणाची दुसऱ्या दिवशी यशस्वी सांगता झाली. (तालुका प्रतिनिधी)
पंधरा दिवसात नवीन डीपी देण्याचे आश्वासन, शेतकऱ्यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 1:50 PM