लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा : गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरवर नाहक गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे या सेंटरवर पाेलीस बंदाेबस्त ठेवण्याची मागणी डाॅक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, बुलडाणातर्फे दिलेल्या या निवेदनात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासोबत कोविड चाचणी शिबिरामध्ये पोलीस कर्मचारी आणि सर्व विभागीय कर्मचाऱ्यांनी लोकांना चाचणी करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि पाॅझिटिव्ह व रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तपासणीसाठी पाठवावे, सर्व कोविड लसीकरण केंद्रांवर पूर्णवेळ पोलीस कर्मचारी उपस्थित असावा, काेविड तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील किमान एक दिवस सुट्टी द्यावी, सर्व कोविड केअर सेंटरवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी तैनात करावे, सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी साेडवाव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. नीलेश टापरे, डॉ. राजेंद्र सांगळे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.