सुब्रमण्यम स्वामींच्या लिखाणाचा काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:01 PM2019-07-08T18:01:52+5:302019-07-08T18:02:00+5:30

बुलडाणा : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल प्रसारमाध्यमामधून अपमानास्पद लिखाण करणाºया भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जयस्तंभ चौकात निषेध करण्यात आला

The protest by the Congress in Buldhana | सुब्रमण्यम स्वामींच्या लिखाणाचा काँग्रेसकडून निषेध

सुब्रमण्यम स्वामींच्या लिखाणाचा काँग्रेसकडून निषेध

Next

बुलडाणा : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल प्रसारमाध्यमामधून अपमानास्पद लिखाण करणाºया भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जयस्तंभ चौकात निषेध करण्यात आला. आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल प्रसारमाध्यमातून अपमानास्पद लिखाण केले. त्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. बुलडाण्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेत निषेध करण्यात आला.  सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अवसरमोल, मिनल आंबेकर, अ‍ॅड. जयश्री शेळके, विनोद बेंडवाल, आकाश दळवी, प्रा. संतोष आंबेकर, लक्ष्मण गवई, छगन खरात, संताराम तायडे, निवृत्ती तांबे, बी. के. खरात, पी. डी. महाले, अभय मोरे, मोहन बाभुळकर, संगिता पवार, सोपान पानपाटील, संजय पाटील, डी. एस. सावळे, विनोद जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

Web Title: The protest by the Congress in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.