शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
3
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
4
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
5
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
6
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
7
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
8
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
9
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
10
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
11
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
12
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
13
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
14
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
15
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
16
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
17
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
18
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
19
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
20
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?

जात प्रमाणपत्रासाठी रोखला राष्ट्रीय महामार्गआदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदाेलन

By सदानंद सिरसाट | Updated: January 11, 2024 16:56 IST

Buldhana News: जात प्रमाणपत्रासाठी रोखला राष्ट्रीय महामार्गआदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदाेलननरवेल (बुलढाणा) : जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे,

- सदानंद सिरसाट बुलढाणा - जात प्रमाणपत्रासाठी रोखला राष्ट्रीय महामार्गआदिवासी कोळी महादेव समाजाचे आंदाेलननरवेल (बुलढाणा) : जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र सुलभतेने द्यावे, यासाठी दि. २ जानेवारी रोजी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या बांधवांनी एल्गार अन्नत्याग उपोषणास सुरुवात केल्यानंतर दहा दिवस उलटूनही उपोषणकर्त्यांची शासनाने कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही.

त्यामुळे आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने हायवे क्रमांक सहावर तांदुळवाडी येथील पुलावर गुरुवारी दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने प्रमाणपत्रासाठी एल्गार अन्नत्याग उपोषण सुरू आहे. अमरावती विभाग बेरार प्रांतमधील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभरीत्या देण्यात यावे, तसेच पाल पारधी, राजपारधी, गावपारधी, हरण शिकार पारधी हे विभक्त जाती-अ व्हिजेएमध्येे येत असून, त्यांनी नाम सदृशाचा फायदा घेत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविले. ते प्रमाणपत्र रद्द करून जप्त करावे, या मागण्यांसाठी गणेश इंगळे, गजानन धाडे, संदीप सपकाळ उपोषणास बसले आहेत; परंतु आदिवासी कोळी महादेव जमातीच्या मागण्याकडे शासन-प्रशासन स्तरावरून दुर्लक्ष होत असल्याने आदिवासी कोळी महादेव जमात संतप्त झाली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई-नागपूर हायवे नंबर सहावर तांदुळवाडी येथील पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. यापुढे शासन-प्रशासनाने लक्ष न दिल्यास यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी कोळी महादेव जमातीचे कार्यकर्ते पुरुषोत्तम झाल्टे, ज्ञानेश्वर खवले, विश्वनाथ पुरकर, वासुदेव सोनवणे, तुकाराम झाल्टे, श्रीकृष्ण तायडे, गंगाधर तायडे, लखन सपकाळ, मधुकर धाडे, गीता कठोरकार, सागर सोनवणे, गणेश सुरळकर, शांताराम धाडे, बाळू पाटील, भागवत घाईट, विलास कांडेलकर, विकास धाडे, राजू शिरसाट, अमित धाडे, संदीप लष्करे या कार्यकर्त्यांना दसरखेड एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमराज कोळी यांनी १८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलिस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले. यावेळी मलकापूर तालुका तसेच बुलढाणा जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीचे हजारो लोक उपस्थित असल्याने पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली.फोटो :

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रbuldhanaबुलडाणा