९ जूनला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रात्री डोणगाव येथे आले असता त्यांचा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आगमनप्रसंगी स्वागत केले. यावेळी शैलेश सावजी यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सध्या शासनामार्फत महाडीबीटीतून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शेतीसाठी यांत्रिक अवजारे वाटप करण्यात येत आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या जवळ बैल आहे, त्या शेतकऱ्यांना बैल संचालित यांत्रिक अवजारे महाडीबीटीतून दिल्या जात नाहीत. ते बैलसंचालित यांत्रिक उपकरणे त्वरित शासनदरबारी मागणी करून आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, हा मुद्दा शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन पटोले यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाला कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे, आ. राजेश एकडे, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शेलैश खेडकर, कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष यासीन कुरेशी, जुबेर कुरेशी, डोणगाव ग्रामपंचायत सदस्य चरण आखाडे, श्याम इंगळे, सचिन साखळकर, विष्णू पळसकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव संदीप पांडव यांच्यासह मेहकर, बुलडाणा, चिखली येथील कॉंग्रेसचे पदाधिकारी व डोणगाव येथील कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाडीबीटीतून बैलसंचालित यांत्रिक उपकरणे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:24 AM