चिखली : मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने दिलेल्या उघडिपीनंतर २८ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता शासनाने दुबार पेरणीकरिता खत, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केली आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, मेहकर व चिखलीचे तहसीलदारांसमवेत जिल्हा परिषदेचे अधिकारी, अभियंता उपस्थित होते.
तालुक्यातील गांगलगाव शिवारात सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे आमखेड येथील पाझरतलावाची भिंत फुटली. या भागातील सर्वच नदीनाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेती खरडून गेली. या शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वर आलेली पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. झालेल्या या नुकसानीची पाहणी राहुल बोंद्रे यांच्यासह जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, मेहकरचे तहसीलदार गरकळ व चिखलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांच्यासमवेत जि.प.चे अधिकारी, कार्यकारी अभियंता पवन पाटील, उपअभियंता गावडे, कनिष्ठ अभियंता खरपास, मेहकर व चिखलीचे बीडीओ, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह तालुका काँग्रेस अध्यक्ष समाधान सुपेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्लोकानंद डांगे, समाधान आकाळ, माजी सभापती अशोकराव पडघान, लक्ष्मणराव अंभोरे, अंबाशी, आमखेडचे सरपंच, उपसरपंच, पाटोदाचे सरपंच किशोर सोळंकी, प्रकाश अंभोरे, शिवाजी भाकडे, अशोक भाकडे, प्रदीप वाघ, लड्डुभाई, हबीबभाई, साबीर शेख, माजी सरपंच हारूणभाई, शिवानंद गायकवाड, अतुल देशमुख, दिलीप देशमुख, आमखेड सरपंच ज्ञानेश्वर वाघ, भगवान वाघ, गजानन वाघ, अमोल सुरडकर, चेतन सोळंकी, प्रताप मोरे, भिकाजी पाटील ढोरे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता राज्य शासनाने दुबार पेरणीसाठी खते, बियाणांसह मशागतीकरिता त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे.