डोणगाव येथील विद्युत पुरवठा रविवारी रात्री नऊ वाजेपासून खंडीत झालेला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत आहे. डोणगाव येथील विद्युतचा पुरवठा विद्युत खात्यामार्फत सुरळीत ठेवण्या संबंधी संबंधितांना आदेश द्यावेत, गेल्या महिन्याभरापासून गावांमधील विद्युत सतत ये जा करत आहे. त्यामुळे सबंध गावकरी त्रस्त झालेले आहेत. विद्युत पुरवठा जर सुरळीत राहत नसेल, तर महावितरणच्यावतीने प्रत्येक घरात कंदील लावण्याकरिता मोफत केरोसीनचा पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी केली आहे.
डोणगाव परिसरात विद्युतच्या समस्या
मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरातील गावांमध्ये वारंवार विद्युत पुरवठ्याच्या समस्या निर्माण होत आहेत. लोणी गवळी, ऊमरा देशमुख, आंध्रूड येथे पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.