निवेदनात असे म्हटले आहे की, येथे लोकसंख्येच्या तुलनेने बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुढे आगामी पोलीस, बीएसएफ, सीआरपीएफ व इतर भरत्या होणार आहेत. या भारतासाठी पूर्वनियोजन म्हणून भरती सराव असणे आवश्यक आहे. मात्र, अमडापूर येथे मैदान उपलब्ध नसल्याने तरुणांचा सराव होत नाही. यासाठी अमडापूर ग्रामपंचायतीने सरावासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून या मैदानावर जास्तीत जास्त युवक सराव करू शकतील. जास्तीत जास्त भरती होतील अशी मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर राम बगाडे, गजानन देशमुख, पवन दायजे, विनोद भारसाकळे, अक्षय आदबाने, सोनू इघवे, कृष्णा वैद्य, वैभव आदबाने, नारायण मानकर, सिद्धेश्वर झाडे व इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून, हे निवेदन देतेवेळी असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
३१ ऑगस्ट रोजी आमसभा आहे. त्या सभेमध्ये हा मैदान मागणीचा विषय मांडून ठराव पास करून घेऊ, सर्व तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या ठिकाणी साप स्वछता करून मैदान सरावासाठी उपलब्ध करून देऊ
- वैशाली संजय गवई, सरपंच, अमडापूर.