डाेणगाव : समृद्धी महामार्गाच्या बाजूला पाणी देण्यासाठी सर्व्हिस राेड देण्याची मागणी संघर्ष समितीने रस्ते विकास महामंडळाचे अभियंता राजेश वर्मा यांच्याकडे केली.
सर्व्हिस रस्त्यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचे काम थांबवले हाेते. त्यामुळे, महामार्ग अधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारी राेजी संघर्ष समितीला चर्चेसाठी पाचारण केले हाेते. यावेळी येथे रस्ते विकास महामंडळाचे अभियंता राजेश वर्मा, मूर्ती, कंत्राटदार कंपनीचे अभियंता यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी शेतकऱ्यांचे पाणी जाण्यासाठी नाली व सर्व्हिस राेड साेडावा अशी मागणी केली. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे रवी पाडव, रितेश वानखेडे, बेलगाव गोविंद मानवतकर, सचिन मानवतकर, शकील पठाण, शेख बीकन ,शेख अयूब , शेख हारूण, राजू इंगळे, पिंकू इंगळे, प्रल्हाद मोरे, त्र्यंबक मोहळे, माधवराव कानकटाव, भागवत मोहळे, संजय पांडव आदीसह इतर शेतकरी उपस्थित हाेते.