आमखेड-अंबाशी, मेरा बु., मेरा खुर्द या भागात यंदा पावसाची तीव्रता खूप जास्त असल्याने, आमखेड-अंबाशी येथील गाव तलाव फुटला आहे. शेतकऱ्यांचे नुकतेच उगवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे शेतजमिनी पिकासह वाहून गेल्या आहेत. अंबाशी गावात पाणी घुसल्याने अनेक घराची पडझड झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याने, याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, शिवसेना शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे, प्रीतम गैची, युवासेना शहर प्रमुख विलास घोलप, गजानन पवार, समाधान जाधव, विशाल इंगळे, पप्पू परिहार, पिंटू गायकवाड, अनिल जावरे, संतोष भुतेकर, संजय अंभोरे, संतोष राजपूत, समाधान थुट्टे, रोहित घोलप, ज्ञानेश्वर घुबे, भागवत जाधव, विनोद घुबे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:23 AM