लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील भरोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आवश्यक तितके शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करणे तर दूरच, उलटपक्षी रिक्त जागांवर नवीन नेमणूक करण्यावर बंदी घालण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, हप्ताभरात नवीन शिक्षकांची नेमणूक न केल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.तालुक्यातील भरोसा हे सुमारे ३ हजार लोकवस्तीचे गाव असून, तेथे मागील ५0 वर्षांंपासून इयत्ता १ ते ७ वीपर्यंंत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा होती; मात्न इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे येथील वर्ग ५ ते ७ हे तीन वर्ग बंद पडले. दरम्यान, वर्ग बंद पडल्याची सल सहन न झाल्याने ग्रामस्थांनी एकजूट होऊन शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा चंग बांधला आणि त्यासाठी लोकवर्गणी करून शाळा डिजिटल बनवण्यात आली. प्रत्येक वर्गात ‘एलसीडी’ लावून संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. शिवाय, परिसरामध्ये वृक्ष लागवड करून शाळेला आधुनिक टच देऊन शाळेतील वातावरण उत्साही बनविण्यात गावकर्यांना यश आले. तथापि, ग्रामस्थांच्या पुढाकारानेच पुन्हा बंद पडलेला पाचवा वर्ग सुरू केला होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता; मात्न जुलै महिन्यामध्ये गवई नामक शिक्षकेची बदली झाल्याने पाचवीतील मुलांच्या पालकांनी मुलांचे प्रवेश रद्द केले, त्यामुळे आता शाळेमध्ये चार वर्ग १३३ मुले व तीन शिक्षक अशी विचित्न परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच एका शिक्षकाकडे मुख्याध्यापक पद असल्यामुळे दोन वर्ग एकाच वर्गात बसवावे लागतात. त्यामुळे लाखो रुपये खर्चून शाळा डिजिटल करूनही पालकांचा भ्रमनिरास झाल्याने संतप्त ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर थुट्टे यांनी ६ सप्टेंबर रोजी शिक्षण अधिकारी बुलडाणा यांना लेखी निवेदन दिले असून, आठवडाभरात कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक न झाल्यास शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. -
कायमस्वरूपी शिक्षक द्या; अन्यथा शाळा बंदचा इशारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:29 AM