त्यांच्या निवेदनाची दखल घेत त्यांनी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र देऊन मागणी केली की, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) आर्ट्स, कॉमर्स व सायन्स या शाखांमध्ये गेल्या २० वर्षांपासून ९० शिक्षक पूर्णवेळ तर ५ शिक्षक अर्धवेळ मानधनावर काम करीत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन पद्धतीने गेल्या १९ वर्षांपासून होत आहे. हे संपूर्ण भारतात रोल मॉडेल होत आहे. माहिती व तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतन अनुदानाबाबत वेळोवेळी आश्वासन देऊन वेतन देण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे. परंतु अद्यापही वेतन अनुदान देण्यात आलेले नाही. अतिशय कमी मानधन असल्यामुळे मुलांचे शिक्षण, वाढती महागाईमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यातील अनेक शिक्षक निवृत्तीच्या जवळ येत आहेत. त्यामुळे या प्रकरणी सहानुभूतीने विचार करून वेतनासाठी लागणारे अनुदान मंजूर करण्याची मागणी केली आहे.
उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना वेतन अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:39 AM