लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शैक्षणिक संस्था, शाळांच्या आवारात तंबाखूसह तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावरील निर्बंधाबाबत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करीत शहरातील शाळेच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर लाल रंगात ‘धूम्रपान निषिद्ध क्षेत्र’ लिहिलेला लोगो लावण्यात आला आहे. शिवाय, गत वर्षभरापासून विविध उपक्रमांतून शाळांची तंबाखूमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.केंद्र शासनाच्या ‘सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा सन २००३’ ची अंमलबजावणीच्या अनुषंगाने शाळांच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटरच्या परिघात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने २०१६ जुलै रोजी हे परिपत्रक काढले होते. त्या अनुषंगाने शहरातील नगरपलिका, जिल्हा परिषद व खासगी अशा जवळपास ४५ शाळा महाविद्यालयांत या नियमाची गत एक वर्षापासून काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे.तंबाखू नियंत्रण कायद्यात कलम ४ नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धूम्रपानास बंदी आहे. कलम (अ)नुसार तंबाखू विक्री लहान मुलांना आणि लहान मुलांकडून करून घेण्यास बंदी आहे. कलम (ब) शैक्षणिक संस्थांपासून १०० मीटर परिघात तंबाखू विक्रीस बंदी आहे, तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर ‘तंबाखूमुक्त शाळा, या शाळेच्या १०० यार्ड परिसरात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने विकण्यास बंदी आहे.धूम्रपान केल्यास २०० रुपये दंड आकारला जाईल, असा लाल अक्षरात फलक लावण्यात आला आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांचा पुढाकार शाळेच्या आवारात किंवा वर्गात शिक्षक कर्मचारीवर्ग तंबाखू, तंबाखूयुक्त पान, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ खात असल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होतो. विद्यार्थी त्याकडे आकर्षित होऊ शकतात. म्हणून शिक्षक कर्मचाऱ्यांनी शाळांच्या आवारात तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, त्या दृष्टिकोनातून शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.
शाळांमध्ये तंबाखू सेवनाबाबत जनजागृती
By admin | Published: May 31, 2017 12:40 AM