बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानाची माहिती गावागावात व्हावी व यामधून लोकसहभाग वाढावा या उद्देशाने या अभियानाचे प्रचार रथ तयार करण्यात आले असून, या रथांना मंगळवारी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी देण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तहसीलदार दिनेश गीते, तहसीलदार दीपक बाजोड, उपविभागीय कृषी अधिकारी एस.जी. डाबरे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवार अभियान हे टँकरमुक्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, अभियानात निवडलेल्या सर्व गावांपर्यंत या अभियानाची माहिती पोहचवावी, असे आवाहन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी या प्रचार अभियानाच्या नियोजनाची विस्तृत माहिती दिली. यावेळी उपवनसंरक्षक धामणकर, उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, अभियंता देशमुख आदी उपस्थित होते. या अभियानां तर्गत पाच प्रचाररथ ३३0 गावांमध्ये फिरणार असून, अभियानाबाबत ग्रामस्थांना माहिती देणार आहेत.
जलयुक्त अभियानाचा ग्रामीण भागात प्रचार
By admin | Published: April 15, 2015 12:49 AM