- अनिल गवई
खामगाव: पारंपरिक शेती ही दिवसेंदिवस खर्चित होत चालली आहे. या उलट फळवर्गीय पीक घेणे. किफायतशीर ठरत आहे. वर्षभर खिशात पैसा खुळखुळत राहतो. वर्णा येथील प्रयोगशील युवा शेतकरी शशिकांत घनश्याम पाटील या शेतकऱ्याने 'कोहळा' या पिकातून उन्नतीचा नवीन मार्ग शोधला आहे.
शशिकांत घनश्याम पाटील यांची मौजा वर्णा शिवारात शेती आहे. या शेतीत पाटील गेल्या जून २0१५ पासून कोहळ्याचे आंतर पिक घेत आहेत. यामध्ये पहिल्या वर्षी त्यांना फारशे यश आले नाही. मात्र, सन २०१६ ते २०१८ या कालावधीत त्यांनी कोहळा पिकाच्या लागवडीतून साडेतिन लाखाचे उत्पन्न घेतले. शेतीची मशागत, पिकाची काढणी आणि बाजारात विक्री वजा जाता त्यांना बºयापैकी उत्पन्न मिळाले. त्यामुळे युवा शेतकरी सोनू पाटील यांनी शेतकºयांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे. पारंपरिक शेती ही सध्या बेभरवशाची झाली आहे. शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे. कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस आणि कधी पावसाची दडी यामुळे अपेक्षित उत्पन्न होत नाही. यामुळे सध्या बहुतांश शेतकऱ्यांचा कल फळवर्गीय पिक लागवडीकडे असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक पिकाच्या मागे न लागता बाजारपेठ ओळखून कमी खचार्ची व भरपूर उत्पन्न देणारी शेती करणे काळाची गरज झाली आहे.
पारंपरिक पिकांना लहरी निसगार्चा मोठा फटका बसतो. अधिक पाऊस आला तरी नुकसान आणि पाऊस कमी झाला तरी नुकसान होते. यामुळे आता बहुतांश शेतकरी फळ वर्गीय लागवडीकडे वळत आहेत. पिक पध्दतीत बदल करण्याचा धाडसामुळे उत्पन्ना काही प्रमाणात भर पडली.
-शशीकांत घनश्याम पाटील, शेतकरी, वर्णा ता. खामगाव.