माेताळा : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून हाेत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन व राजेश गवई यांच्या नेतृत्वाखाली मोताळा तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले हाेते. या आंदाेलनाची दखल घेत तहसीलदारांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत आक्रमक पवित्रा घेतला हाेता. तसेच तहसीलदार जोपर्यंत लेखी स्वरूपात पंचनाम्याचे आदेश काढत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला होता. तहसीलदार यांनी तत्काळ लेखी आदेश दिले. यावेळी विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन, महेंद्र जाधव, शे. रफिक शे. करीम, राजेश गवई, मारोती मेढे, राजू पन्हाळकर, बाबूराव सोनोने, चंदू गवळी, राजू गायकवाड, गजानन गवळी, राजू शिंदे, संदीप गोरे, विजय बोराडे, निखिल पाटील, भागवत धोरण, गजानन तायडे, नारायण तायडे, शे. नाजीम, शब्बीर मिस्त्री, शे. सलीम शे. हशम,धम्मदीप वानखेडे, मनोहर उमाळे, वैभव शिरसाट, राजू सुरडकर, वासुदेव मेढे, शुभम मेढे, शुभम इंगळे, नामदेव बोरकर, गोपाल मिरगे आदी उपस्थित हाेते.