अमडापूर हे चिखली तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाशी परिसरातील जवळपास ४८ ते ५० खेड्यांचा संपर्क येतो. या ठिकाणी दळणवळणाची सर्व साधने उपलब्ध असल्याने सर्व नागरिक जीवनवश्यक वस्तु खरेदीसाठी ये-जा करतात. आल्यानंतर मात्र कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. जणू काही कोरोणा संपला असल्यासारखे बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत. शासनाने ठरवून दिलेले कोविड नियम पाळत नसल्याने १० एप्रिल रोजी अमडापूर पोलीस व ग्रामपंचायत कार्यालय यांनी संयुक्तपणे मास्क न लावणाऱ्यांवर व ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून १३०० रुपयांचा दंड वसूल केला. नागरिकांनी नियमांचे पालन करून तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा, गर्दी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले. या कारवाईत अमडापूरचे ठाणेदार अमित वानखेडे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:32 AM