- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत गत पाच वर्षात जिल्हयातील १.७० लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला असल्याचे दिसून येते. यापैकी किती पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला हा चौकशीचा विषय बनला आहे. ठिबक सिंचन योजनेतील घोळ ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.ही योजना राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये राबविण्यात आली. प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील पाणी पातळी खोल गेलेल्या गावातील शेतकºयांना प्रामुख्याने योजनेचा लाभ देण्यात आला.संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा, सोनाळा, बावनबीर, कवठळ या सर्कलमध्ये ४०,०७३ शेतकºयांनी सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतल्याची नोंद आहे. यापैकी अनेक शेतकºयांनी शासनाच्या इतर योजनांचा सुद्धा लाभ घेतल्याचे वास्तव आहे. वास्तविकत: या योजनेचा किंवा अर्थसहाय्य मिळू शकणार नाही असे असतानाही अधिकाºयांनी कोणतीही खातरजमा व चौकशी न करता केवळ आपल्या टक्केवारीसाठी शासनाची दिशाभूल केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.‘कारकुन’ बनला ‘सेतू’एकीकडे खामगाव कृषी उपविभागाअंतर्गत जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव, शेगाव ही चार तालुके येतात. खामगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी हितसंबध असलेल्या संग्रामपूर येथील कृषी विभागातील एका कारकुनने ठिबक सिंचन घोटाळ््यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
पात्र लाभार्थी शेतकºयांना योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. वैयक्तीक लाभापोटी काही शेतकºयांना हाताशी धरून ज्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी स्वार्थ साधला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. याप्रकाराची चौकशी करण्यासाठी तालुकास्तरीय स्वतंत्र पथक नेमावे. जेणेकरून भ्रष्टाचार समोर येईल.- मोहन पाटील, संपर्क प्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना,जळगाव मतदारसंघ.
ही योजना बºयाच वर्षापासून राबविली जात आहे. संग्रामपूर येथे साडेतीन वर्ष मी कार्यरत होते. आता सध्या बुलडाणा येथे असल्याने गैरप्रकाराबाबत नेमके सांगता येणार नाही.- ज्ञानेश्वर सवडतकर, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर