शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

‘नॉन एफएक्यू’ शेतमाल खरेदी अडकली परवानगीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 7:11 PM

बुलडाणा : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नॉन एफएक्यू दर्जाचा शेतमाल येत असल्याने या मालाची व्यापाºयांकडून योग्य दरात खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे बाजार समित्यांकडून जिल्हा उपनिबंधकाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकामार्फत नॉन एफएक्यू दर्जाचा शेतमाल खरेदी विक्रीस परवानगी घेणे पणन महासंघाने सक्तीचे केले आहे. नॉन एफएक्यू दर्जाच्या शेतमालाची खरेदी-विक्री परवानगीच्या प्रक्रियेत अडकल्याने काही बाजार समित्यांमधील खरेदी - विक्री ठप्प पडली आहे.  

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधकांकडे जातो प्रस्ताव बाजार समित्यांमधील खरेदी- विक्री ठप्प  

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नॉन एफएक्यू दर्जाचा शेतमाल येत असल्याने या मालाची व्यापाºयांकडून योग्य दरात खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे बाजार समित्यांकडून जिल्हा उपनिबंधकाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकामार्फत नॉन एफएक्यू दर्जाचा शेतमाल खरेदी विक्रीस परवानगी घेणे पणन महासंघाने सक्तीचे केले आहे. नॉन एफएक्यू दर्जाच्या शेतमालाची खरेदी-विक्री परवानगीच्या प्रक्रियेत अडकल्याने काही बाजार समित्यांमधील खरेदी - विक्री ठप्प पडली आहे.  कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उडिद, मूग आदी शेतमला विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी हमीभाव ठवरूव दिलेले आहेत. हमीभावानुसार शेतमालाची खरेदी करण्याच्या सूचना प्रत्येक बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत. किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी-विक्रीची जबाबदारी बाजार समितीवर असून कमी दराने खरेदी-विक्री व्यवहार होत असल्यास त्याला प्रतिबंध करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. केंद्र शासनाने उडीद ५ हजार ४०० व मूग ५ हजार ५७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभावामध्ये खरेदी करणे बंधकारक केले आहे. तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ चे कलम ३२ (ड) अन्वये प्रतिबंध करण्याची जबाबदारी संबंधीत बाजार समितीची आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करण्यात येवू नये, याबाबत बाजार समितींना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमानुसार निर्देश दिलेले आहेत. उडीद व ज्वारी या शेतमालाची नॉन एफ.ए.क्यू. दर्जाचा शेतमाल खरेदी करताना कोणती उपाययोजना करण्यात यावी, याच्या सुचना सर्व बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत. ज्या बाजार समितीमध्ये  नॉन एफ.ए.क्यू. दर्जाचा शेतमाल येण्याची शक्यता आहे, अशा बाजार समित्यांकडुन जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक केले आहे. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकामार्फत नॉन एफ.ए.क्यू. दर्जाचा शेतमाल खरेदी-विक्रीस परवानगी देण्यात येते. नॉन एफ.ए.क्यू. दर्जाच्या शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापाºयांकडून पनवानगीच्या नियमांवर बोट ठेवून बाजार समितीतून शेतमाल वापस पाठवला जात आहे. अनेक बाजार समितीमध्ये तर खरेदी-विक्री ठप्प केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कमी दर्जा असलेल्या मालाची होणार खरेदी ज्वारी व उडिदासह सर्व मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी सर्व बाजार समित्यांना सूचना दिलेल्या आहेत.  नॉन एफएक्यू दर्जाचा माल खरेदी करण्यासाठी बाजार समितीने संबंधित जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव सादर केल्यावर त्या बाजार समितीला तशी खरेदी करण्याला परवानगी देण्यात येईल, असे निर्देश पणन संचालकांनी बाजार समित्यांना दिल्यामुळे  बाजार समित्यांमध्ये शेतमालाची खरेदी-विक्री  रखडली आहे. मात्र, पणन महासंघाच्या या निर्देशामुळे आता बाजार समित्यांनाही कमी दर्जा असलेल्या मालाची खरेदी करता येणार आहे.पावसाच्या फटक्यामुळे ढासळला दर्जाउडिद व मूगाचा शेवटचा हंगाम असताना पावसाची संततधार सुरू होती. गत आठवड्यात झालेल्या या पावसाच्या फटक्याने अनेकांचा उडीद, मूग आदी शेतमाल भिजला.  काही शेतकºयांनी शेतात उडीद पिकाची सुडी लावलेली होती. त्या सुडीवरील उडिदही खराब झाला. ओलाव्यामुळे अनेकांच्या उडिद व मूग या पिकाला बुरशी लागली आहे. त्यामुळे सध्या बाजार समित्यांमध्ये येत असलेला शेतमाल डागी स्वरूपाचा आहे. दर्जा ढासाळलेल्या या शेतमालाला योग्य भाव देणे व्यापाºयांसमोर एक नविन संकट निर्माण झाले आहे.