- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: आतापर्यंत परिवहन महामंडळाची एसटी बस, शासकीय वाहने किंवा इतर कुठल्याही भंगार झालेल्या वाहनाला धक्का देण्याची वेळ आल्याचा प्रकार आपण पाहिला. परंतू आज चक्क ईव्हीएम ठेवलेल्या एका ट्रकलाच धक्का द्यावा लागल्याचे चित्र बुलडाणा येथील स्ट्राँग रुमवर दिसून आले. लोकसभा निवडणुकीसाठी गुरूवारी सायंकाळी सहावाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर १८ तासात सर्व ईव्हीएम येथील स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षित पोहचल्या आहेत.
मतदानानंतर सर्व ईव्हीएम सुरक्षीत ठेवण्यासाठी बुलडाणा येथील आयटीआय कॉलेजमध्ये स्ट्राँग रुमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएम या त्यांच्या-त्यांच्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक विधानसभानिहाय तेथून गेलेल्या ईव्हीएम, परत आलेल्या ईव्हीएम याची मोजणी झाली. सर्व व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रत्येक बुधनिहाय ईव्हीएम ट्रकमध्ये व्यवस्थित लावून सील बंद करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालत होती. सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जातीने हजर होते. त्यानंतर पोलीस सुरक्षेच्या घेºयात सर्व ट्रक बुलडाणा येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचवण्यात आले. स्ट्राँग रुमच्या ठिकाणी आलेल्या एका ट्रक (क्रमांक एचएच - २८-एबी-७७००) ला धक्का देण्याची वेळ कर्मचाºयांवर आल्याचे दिसून आले. स्ट्राँग रुममध्ये घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
1. ईव्हीएम घेऊन येणारा पहिला ट्रक शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता दरम्यान बुलडाणा येथील स्ट्राँग रुमवर पोहचला. हा ट्रक बुलडाणा विभानसभेचा होता. त्यानंतर शेवटचा ट्रक दुपारी १२ वाजता पोहचला. 2. बुलडाणा येथे असलेल्या स्ट्राँग रूम परिसरात अनेक ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून चोख व्यवस्था आहे. 3. ईव्हीएमचे ट्रक स्ट्राँग रुमवर पोहचण्याची प्रक्रिया रात्रभर उशीरापर्यंत सुरू होती. 4. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनची वाहतूक खुल्या वाहनातून न करता बंदिस्त असलेल्या ट्रकमधून करावी. तसेच वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व विधानसभा मिळून जवळपास १८ कंटेनरचा उपयोग करण्यात आला. यासर्व कंटेनरवर जीपीएस यंत्रणा होती. तसेच पोलीस यंत्रणेचा तगडा बंदोबस्त याठिकाणी पाहावयास मिळाला.
पाहा व्हिडीओ