चिखली , दि. २0- गेल्या दोन वर्षांत भाजपा सरकारने केलेल्या प्रगतीचे पुस्तक जनतेने तपासले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. ब्रिटिशकालीन आणेवारी काढण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणल्यामुळे शेतकर्याला आता नुकसान भरपाई देणे सुकर झाले आहे. काँग्रेसच्या नेत्यांना भुईमुगाला शेंगा खाली येतात की वर, याचीदेखील जाण नाही, अशी काँग्रेसवर टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी येथील मेळाव्याला संबोधित केले.नगरपालिका निवडणुकांमध्ये जिल्हय़ात भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल जनतेप्रती आभार व्यक्त करण्यासह, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा मेळावा आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळय़ाचे आयोजन चिखली नगर परिषदेच्यावतीने स्थानिक राजा टॉवरच्या प्रांगणात २0 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय कुटे, गोविंदराव केंद्रे, नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, उपाध्यक्ष वजीराबी शे.अनिस, अँड. विजय कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना खा. दानवे म्हणाले, की राज्य व केंद्र सरकार शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असून, दोन वर्षांत ४२00 कोटी रुपयांचे अनुदान शेतीवर खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ना. देवेंद्र फडणवीस सरकार हे विदर्भाचा सर्वच क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्यास कटिबद्ध असून, रस्ते व इतर पायाभूत सुविधांबरोबरच दरडोई उत्पन्नातील पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात असलेली तफावत दूर करण्यासह पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन आवश्यक ते पावले उचलत असून, याचे परिणाम आगामी काळात दिसून येणार असल्याचे गृहराज्यमंत्री ना.डॉ. रणजित पाटील यावेळी त्यांनी सांगितले. प्रसंगी आ.चैनसुख संचेती, आ.संजय कुटे, डॉ. प्रतापसिंग राजपूत आदींची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक युवा नेते कुणाल बोंद्रे यांनी केले. संचालन मोहन शर्मा तर आभार तालुकाध्यक्ष सुनील पोफळे यांनी मानले. यावेळी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भाजपाला नगरपालिकेत जनतेने दिले ‘फस्र्ट क्लास’चे गुण- रावसाहेब दानवे
By admin | Published: January 21, 2017 2:40 AM