शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

सहा जिल्ह्यातील सुक्ष्म नियोजन आराखड्यांची गुणवत्ता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:44 PM

खामगाव: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा अर्थात मायक्रो प्लानिंग तयार करण्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यात अप्रशिक्षित कर्मचाºयांकडून मायक्रोप्लॉनिंगचे काम केले जात आहे.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्युज नेटवर्कखामगाव: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा अर्थात मायक्रो प्लानिंग तयार करण्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यात अप्रशिक्षित कर्मचाºयांकडून मायक्रोप्लॉनिंगचे काम केले जात आहे. यामुळे योजनेच्या सुक्ष्म नियोजन आराखड्यांच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी विभागाचे या प्रक्रियेवर कुठलेही नियंत्रण नसल्याने अधिकाºयांनी हात वर केले आहेत. दुष्काळग्रस्तांना आधार मिळावा, तसेच पाणी व जमिनीची पोत सुधारण्यासोबतच लहान व मध्यम शेतकºयांचा विकास व्हावा, बदलत्या हवामानानुसार शेतकºयांना शेती करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यान्वीत केली आहे. सध्या शासनाचे या योजनेकडे सर्वात जास्त लक्ष असून योजना पुर्णत्वास नेण्यासाठी शासनाने जागतिक बँकेकडून कर्ज देखिल घेतले आहे. एकूण तिन टप्प्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतील कामांना वेग देण्यासाठी ग्राम कृषी संजिवनी समित्यासुध्दा गठीत करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या गावांचा ‘सुक्ष्म नियोजन आराखडा’ ही या योजनेतील महत्वाची बाब आहे. यासाठी राज्यभरात ‘यशदा’कडून प्रशिक्षण घेतलेल्या ५० प्रविण प्रशिक्षकांची टीमही तयार आहे. सुक्ष्म नियोजन आराखड्याच्या आधारावरच या योजनेचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याने सदर आराखडा ‘यशदा’च्या प्रविण प्रशिक्षकांकडून तयार करणे अपेक्षित असताना, असे प्रशिक्षण न घेतलेल्या अंमळनेर येथील राष्ट्रविकास बहु.सामाजिक संस्थेला विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा व हिंगोली आदी जिल्ह्यातील निवड झालेल्या गावांचा सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे अशा संस्थेकडून तयार करण्यात येणाºया सुक्ष्म नियोजन आराखड्याची गुणवत्ता किती दर्जेदार असेल, याबाबत शंका उपस्थीत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे उपविभागीय कृषी अधिकाºयांना याबबात कुठलीही कल्पना नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

संस्था सदस्यांना द्यावे प्रशिक्षणनानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना राबविण्यासाठी शासनाकडे कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने संस्थांकडून कामे करून घेण्यात येत असावीत, अशीही चर्चा आहे. परंतु ज्या संस्थांना काम देण्यात येत आहे, अशा संस्थांकडून मायक्रोप्लॅनिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कर्मचाºयांना ‘यशदा’ कडून विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्ह्यात येथे झाले काम नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १०३ गावांची निवड करण्यात आली आहे. यापैकी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, खिरोडा, पलसोडा,  शेगाव तालुक्यातील भास्तनसह इतर काही गावांमध्ये सदर संस्थेने आराखडे तयार केल्याची माहिती आहे. 

 ज्या लोकांकडून सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून शेतकºयांना योजनेबद्दल पाहिजे तसे समजावून सांगण्यात आले नाही. यामुळे सदर योजनेचा उद्देश कितपत यशस्वी होईल, याबाबत संशय आहे.

- राजु मिरगे पाटील (माजी पंचायत समिती सभापती, शेगाव) 

 जर त्या संस्थेची नेमणूक झाली आहे. तर त्या संस्थेकडे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. असेच समजावे लागेल. - पुरुषोत्तम अनगाईत, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव

 तालुक्यात सुरु असलेल्या कामांची कोणतीही माहिती नाही. सदर काम माझ्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. -  ढाकणे, तालुका कृषी अधिकारी शेगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव