शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निवडणूकीच्या धामधूमीत  २२ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 4:36 PM

या कर्मचाºयांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता असून सर्वच कर्मचारी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विधानसभेसाठी २१ आॅक्टोबररोजी मतदान होत आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आॅक्टोबररचे वेतन दिवाळीपुर्वी होणार नसल्याने जिल्हयातील महसुल, नगर परिषद, कृषी आदी विभागातील सुमारे २० हजार कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या कर्मचाºयांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता असून सर्वच कर्मचारी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.सालाबादप्रमाणे शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांना दिवाळीपुर्वीच वेतन मिळत होते. यंदाही दिवाळी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी म्हणजे २५ ला आली आहे. त्यामुळे मंत्रालयातील सचिव इंद्रजीत गोरे यांनी ९ आॅक्टोबरला पत्र काढून दिवाळीपुर्वीच अधिकारी आणि कर्मचाºयांचे वेतन देण्याचे आदेश लेखा व कोषागार विभागाला दिले होते. परंतु विधानसभा निवडणुकीचा आडोसा घेत लेखा आणि कोषागारचे उपसचिव मेनन यांनी लेखा व कोषागार विभागातील अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण समोर करत आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपुर्वी देणे शक्य नाही. त्यामुळे सर्वच अधिकारी-कर्मचाºयांचे वेतन नोव्हेंबर महिन्यातच होणार असल्याचे पत्र काढल्याने सर्वच स्तरावरील चाकरमान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळीपुर्वी वेतन न मिळाल्याने यंदाची दिवाळी कर्मचाºयांना कडू जाणार आहे. तर चाकरमान्यांच्या वेतनाअभावी बाजारपेठेतील गर्दीमध्येही यंदा मोठी घट होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. याचबरोबर दिवाळीच्या बाजारावरही याचा परिणाम दिसून येणार आहे. खामगाव येथील महसुल विभागातील सुमारे १०६ आणि नगर परिषदेतील ३९२ अधिकारी कर्मचाºयांना दिवाळीपुर्वी वेतन मिळणार नसल्याने या अधिकाºयांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव