लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथे सुरू झालेल्या नाफेडच्या हमीदराने तूर खरेदी केंद्रावर पहिल्यास दिवशी नंबरच्या कारणावरून गोंधळ झाला. अधिकारी आल्यानंतर पोलीस बंदोबस्तात रांगा लावून टोकन देणे सुरू झाल्यानंतर गोंधळ बंद होऊन तूर खरेदी सुरू झाली. खामगाव येथे आतापर्यंत विदर्भ मार्केटिंग को-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्यावतीने तूर खरेदी करण्यात आली. दरम्यान, शासनाने ३१ मेपर्यंत तूर खरेदीचे आदेश दिल्याने खामगाव येथील केंद्रावर मोठ्या प्रमाणात तूर विक्रीला आली आहे. १६ मेपासून येथे तुरीची खरेदी सुरू झाली. दरम्यान, पहिल्याच दिवशी नंबरवरून गोंधळ उडाला. या गोंधळामुळे शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक शुभांगी देशमुख यांच्यासह पोलीस ताफा बंदोबस्तासाठी हजर झाला, तसेच सहायक निबंधक कृपलानी यांनीही या केंद्रावर भेट दिली. यानंतर रांगा लावून टोकनच्या वाटपाचा निर्णय घेत रांगा लागल्यानंतर टोकनचे वाटप सुरू करण्यात आले, तसेच तूर खरेदी सुरू करण्यात आली.
खामगाव येथे नाफेडच्या केंद्रावर ‘राडा’
By admin | Published: May 17, 2017 1:21 AM