धाड : बोदेगाव शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ एप्रिल रोजी ही कारवाई केली. मागील काही दिवसांपासून धाड पोलिस स्टेशन हद्दीतील बोदेगाव शिवारात सर्रास जुगार क्लब सुरु होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त माहिती मिळाल्याने २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जुगाराच्या क्लबवर छापा टाकण्यात आला. काही जुगारींनी घटनास्थळावरुन पळ काढला तर १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये शरद सावंत, गणेश ताठे, संजय लोखंडे, गजानन जाधव, मुस्ताक शहा अजिज शहा, विष्णू सोनुने, मधुकर कोरडे, रामराव भोंडे, भिमसिंग बारवाल, अफसर शहा करीम शहा, म्हातारजी काळे, कैलास सुरडकर यांचा समावेश आहे. स्थानिक पोलिस अनभिज्ञबोदेगाव शिवारात लाखो रुपयांचा जुगार सुरु असल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र पोलिसांना केवळ ६२ हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. अनेक जणांनी याठिकाणावरुन पळ काढला. तसेच अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या जुगार क्लबबद्दल स्थानिक पोलिस अनभिज्ञ कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. धाड पोलिस स्टेशन हद्दीत कुठलेच अवैध धंदे सुरु नाहीत. आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.- संग्राम पाटील, ठाणेदार
बोदेगाव शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा, १२ आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 5:29 PM
धाड : बोदेगाव शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देबुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ एप्रिल रोजी ही कारवाई केली. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जुगाराच्या क्लबवर छापा टाकण्यात आला.