मोताळा : तालुक्यातील काेथळी येथे सुरू असलेल्या जुगारावर पाेलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकून १३ जणांवर कारवाई केली़ त्यांच्याकडून दीड लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला़
कोथळी येथील विद्युत उपकेंद्राच्या परिसरातील शेतात जुगार सुरू असल्याची माहिती बाेराखेडी पाेलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे पाेलिसांनी धाड टाकून विनोद गोविंदा वावगे, नितीन गोविंदा जोहरी, गणेश पंढरी गणगे, धोंडू ऊर्फ अजय सापुर्डा फासे, विकास जयराम तायडे, विलास सुधाकर बावस्कार, उमेश भावसिंग माळी, अंकुश गजानन राऊत, तुषार भगवान भारसाकळे, शेख अक्रम शेख हशम, स्वप्निल राजेंद्र ठोंबरे, राहुल गजानन महाकाळ, प्रवीण प्रकाश मोताळकर यांच्यावर कारवाई केली़ या आराेपींकडून १ लाख ५९ हजार ७६० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला़ सर्व आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बाेराखेडी पाेलीस करीत आहेत़