बुलडाणा : अवैध सावकारी प्रकरणात बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या सहा तक्रारींच्या आधारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने एकाच दिवशी ७९ कर्मचार्यांच्या सहकार्याने खामगाव, चिखली, नांदुरा, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात ११ ठिकाणी छापे मारून महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिस दलाच्या सहकार्यानेही ही कारवाई करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मध्यंतरी कथित अवैध सावकारी व्यवसायाबाबत सहा तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम १६ अंतर्गत ११ ठिकाणी हे छापे टाकून झडती घेतली. यामध्ये सहकार विभागातील ७० कर्मचारी आणि जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे नऊ कर्मचारी अशा ७९ जणांच्या पथकाने जिल्ह्यात व्यापकस्तरावर हे झडती अभियान राबवले. या कामी महसूल आणि पोलिस दलाचेही सहकार्य घेण्यात आले. खामगाव येथे तीन पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये संबंधित गैरअर्जदार यांच्या राहत्या घरी व दुकानामध्ये झडती घेण्यात येऊन तेथून नोंदणीकृत खरेदी खते, पैशांच्या व्यवहारांच्यानोंदी असलेल्या वह्या अशा स्वरुपाची कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतलीआहे. नांदुरा येथील तीन पथकांनी तेथे गैरअर्जदारांच्या निवास , प्रतिष्ठाणांची झडती घेऊन नोंदणीकृत खरेदीखते व इतर दस्तऐवज जप्त केले. शेगाव तालुक्यातील कारवाईदरम्यान खरेदीखते, कोरे बॉन्ड अशी कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. चिखली तालुक्यातील धोत्रा भंगोजी गावात तीन पथकांनी केलेल्या कारवाईत तीन व्यक्तींकडून खरेदी खते, कोरे चेक, बॉन्ड अशा स्वरुपाची कागदपत्रे हस्तगत केलेली आहेत. आसलगावात घर केले सील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे एका ठिकाणी कारवाईदरम्यान संबंधित व्यक्ती गैरहजर असल्याने त्याच्या घरातील व्यवसायाचे ठिकाण कुलूपबंद होते. तेथे कुणीही हजर नसल्याने ते ठिकाण सिलबंद करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निबंधकांनी (सावकारी) दिली. पंचनामे सुरू खामगावात तीन, चिखली तालुक्यात तीन, नांदुरा तालुक्यात तीन, जळगाव जामोद तालुक्यात एक आणि शेगाव तालुक्यात एका ठिकाणी छापे टाकून सहकार विभागाने आक्षेपार्ह्य कागदपत्रे जप्त केली आहेत. सद्या या कारवाईचा रितसर पंचनामा सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असून कारवाईनंतर प्राप्त झालेल्या कागदपत्रांची छाननी व पाहणी करून या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ७९ जणांच्या पथकाने तीन मे रोजी केली आहे.
अवैध सावकारी प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यात ११ ठिकाणी छापे; पाच तालुक्यात धडक मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:31 PM
बुलडाणा : अवैध सावकारी प्रकरणात बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या सहा तक्रारींच्या आधारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने एकाच दिवशी ७९ कर्मचार्यांच्या सहकार्याने खामगाव, चिखली, नांदुरा, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात ११ ठिकाणी छापे मारून महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत.
ठळक मुद्देनांदुरा येथील तीन पथकांनी तेथे गैरअर्जदारांच्या निवास , प्रतिष्ठाणांची झडती घेऊन नोंदणीकृत खरेदीखते व इतर दस्तऐवज जप्त केले. शेगाव तालुक्यातील कारवाईदरम्यान खरेदीखते, कोरे बॉन्ड अशी कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. खामगाव येथे तीन पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये संबंधित गैरअर्जदार यांच्या राहत्या घरी व दुकानामध्ये झडती घेऊन कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतलीआहे