अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमित वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांना ४ मे रोजी चिखली तालुक्यातील सावरखेडनजिक शिवारामध्ये दारू अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान, अमडापूर पोलिसांनी त्या दारू अड्ड्यावर धाड टाकली. त्यामध्ये आरोपी रंगराव राहुल इंगळे (वय ६०, रा. सावरखेडनजिक) हा हातभट्टी दारु गाळत असल्याने त्याचे जवळून एकूण ४९५० रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर सावरखेडनजीक शिवारामध्येच आरोपी बबन कुंडलीक नाटेकर (वय ४८, रा. कव्हळा), भिका तुकाराम तोडे (वय ४८), गजानन बाळु सहाने (वय ३०, रा. सावरखेड नजिक) व प्रभू श्रावण कसारे (वय २६, रा. मलकापूर पांगरा) यांच्याकडून दारूसह असा एकूण ६७०० रुपयांचा माल जप्त केला आहे. ठाणेदार अमित वानखेडे व त्यांचे सहकारी शत्रुघ्न शिंदे, गजानन राजपूत यांनी ही कारवाई केली आहे.
दारू अड्ड्यावर धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:57 AM