लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : उमरज सोईडींगवरून दगडी कोळसा घेऊन नाशिक पॉवर हाउसकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीतील कोळशाने पेट घेतल्याची घटना शेगावनंतर येथे सुद्धा रविवारी रात्री घडली. ही घटना लक्षात आल्यानंतर चांदुरबिस्वा रेल्वे स्टेशनचे अधीक्षकांनी मलकापूर स्टेशन अधीक्षकांना माहिती दिली. प्रसंगावधान राखून घटनेची माहिती नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांना देताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पाणीपुरवठा सभापती अनिल गांधी, गजानन ठोसर घटनास्थळी दाखल झाले व अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग त्वरित विझवली व रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.
रेल्वे मालगाडीतील कोळशाने घेतला पेट!
By admin | Published: May 30, 2017 1:21 AM